मुंबई : जिओने फ्री टॉकटाईम आणि इंटरनेट सुविधा सुरु केल्यानंतर जिओच्या यूझर्सची संख्या झटपट वाढली. यामुळे इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र तुम्हाला माहीत आहे का जिओच्या या फ्री ऑफरचा लोकांनी कसा वापर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिपोर्टनुसार इंटरनेटवर जिओच्या फ्री डेटा ऑफरचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असल्याचे समोर आलेय. रिलायन्स जिओच्या फ्री इंटरनेटचा सर्वाधिक वापर सोशल मीडियासाठी होतोय. स्मार्टअॅपच्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आलीये.


सोशल मीडियाव्यतिरिक्तही जिओच्या फ्री ऑफरचा फायदा अधिकतर व्हिडीओजसाठी झालाय. यात यूट्यूब, हॉटस्टार. अॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स साऱख्या व्हिडीओ अॅप्सचा समावेश आहे. 


जिओच्या फ्री इंटरनेटचा सर्वात कमी फायदा स्पोर्ट्स अॅप्सना झाला. तर न्यूज आणि म्युझिक अॅप्सनाही तितकासा फायदा झाला नाही.