जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन लॉन्च
लग्जरी स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vertu ने Constellation नावाचा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन जगातील सर्वात महाग स्मार्टफोन आहे. कंपनीने मात्र याची किंमत अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. पण याची किंमत ५ लाखापेक्षा अधिक असू शकते असं बोललं जातंय.
मुंबई : लग्जरी स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vertu ने Constellation नावाचा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन जगातील सर्वात महाग स्मार्टफोन आहे. कंपनीने मात्र याची किंमत अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. पण याची किंमत ५ लाखापेक्षा अधिक असू शकते असं बोललं जातंय.
कंपनीने काही दिवसांपूर्वी सिग्नेचर टच फोन लॉन्च केला होता त्याची किंमत ५ लाख रुपये होती. हा लेटेस्ट स्मार्टफोन anodized aluminium पासून बनला आहे. यावर सॉफ्ट लेदर लावण्यात आली आहे. याचा डिस्प्ले क्रिस्टल नीलमचा असणार आहे तर बटन हे रुबीपासून बनलेले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, या फोनवरील सर्व कॉल इनस्क्रिप्ट असणार आहेत. ५.५ इंचाचा QHD AMOLED डिस्प्ले असणार आहे. हा फोन अँड्रॉइड मार्शमेलो ऑपरेटींग सिस्टीमवर काम करतो.
फोनचा डिस्प्ले स्क्रॅचप्रूफ ग्लास लेअर पासून बनला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. 3200 मेगाहर्ट्जची बॅटरी यामध्ये देण्य़ात आली आहे. सोबतच Wi-Fi, Bluetooth, NFC आणि USB Type-C यासारखे कनेक्टिविटी ऑप्शन देण्यात आले आहेत.
फ्रंट फेसिंग स्टीरियो स्पीकर यामध्ये देण्यात आला आहे. जो डॉल्बी डिजिटल प्लसपासून पावर्ड आहे. जो एक चांगला ऑडियो एक्सपीरियंस देतो. लग्जरी स्मार्टफोन बनवणारी कंपनी Vertu ला १९९८ मध्ये नोकियाने सुरु केली होती.