मुंबई : दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या 'व्होडाफोन' या कंपनीनं काही भागांमधील प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड थ्री जी - फोर जी इंटरनेट डाटाची ऑफर जाहीर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 16 रुपयांत एक तासासाठी अनलिमिटेड थ्री जी - फोर जी इंटरनेट डाटा प्लान व्होडाफोननं सादर केलाय. 


याशिवाय पाच रुपयांत एका तासासाठी अनलिमिटेड 2 जी डाटा तसंच सात रुपयांत लोकल सर्कलमध्ये व्होडाफोन टू व्होडाफोन अनलिमिटेड कॉलचीही ऑफर व्होडाफोननं सादर केलीय. 


ही ऑफर 7 जानेवारी रोजी लॉन्च होईल.... तर 9 जानेवारीपासून ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध होईल. वेगवेगळ्या सर्कलमध्ये याचे दर वेगळे असतील असंही कंपनीनं जाहीर केलंय. 


ही थ्रीजी फोर जी ऑफर बिहार, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगना भागातील सर्कल्समध्ये उपलब्ध नसेल.