स्मार्टफोनवर Porn फिल्म पाहणे होऊ शकते धोकादायक
स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक होऊ शकते. आपण पाहणार आहोत, कसे पॉर्न फिल्म स्मार्टफोनवर पाहिल्यावर कसे तुम्ही अडचणीत सापडू शकतात.
नवी दिल्ली : स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म पाहणे कधी कधी धोकादायक होऊ शकते. आपण पाहणार आहोत, कसे पॉर्न फिल्म स्मार्टफोनवर पाहिल्यावर कसे तुम्ही अडचणीत सापडू शकतात.
असे अॅप्स डाऊनलोड करणे खतरनाक
पॉर्न फिल्म पाहताना त्यासोबत काही अॅप्स आपोआप डाऊन लोड होतात. त्यामुळे फोनमध्ये व्हायरस शिरू शकतो. पॉर्न साइटला भेट दिल्यावरही असे अॅप्स डाऊनलोड होतात.
याचा उपाय म्हणजे अॅप्स आपोआप डाऊनलोड न होण्यासाठी ऑटोमॅटीक डाऊनलोड हे ऑप्शन बंद केले पाहिजे. हे ऑप्शन बंद केले नाही तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस घुसू शकतो.
व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस
मोबाईलवर पोर्न पाहणे महागात पडू शकतो. काही पॉप्युलर पॉर्नसाठी अवैधपणे काही व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस जोडून पैसे कमविण्याचा धंदा मांडलेला असतो. जसा तुम्ही अँड्रॉइड फोनवर पॉर्न वेबसाइट ओपन केली तर vas सर्व्हिस आपोआप अॅक्टीवेट होते. तुम्हांला कळतही नाही की तुमचे पैसे कट कसे झालेत. याची काळजी युजर्सने घेतली पाहिजे.
पॉर्न टिकर
अँड्रॉइड स्मार्टफोनवर पॉर्न टीकरची एक जुनी समस्या आहे. हे टीकर नेहमीच्या टीकर सारखे दिसतात त्यामुळे युजर्स धोका खाऊ शकतात. पॉर्न टीकर मोबाइलमध्ये व्हायरस पाठविण्यासाठी तयार केले जातात.
सुरक्षेला धोका
ज्या अँड्रॉइड फोनने पॉर्न वेबसाइट पाहिल्या त्याच्यावर जी मेल लॉगिन असते अशात पॉर्न वेबसाइटला आपला जी मेल आयडी मिळतो. त्यामुळे हॅकर असा मेल हॅक करून तुमचा डाटा चोरू शकतात.
डिव्हाइस लॉक होतो
पॉर्न साइटवर काही व्हायरस असतात. त्यामुळे डिव्हाइस लॉक होते. त्याला अनलॉक करण्यासाठी काही फ्रॉड वेबसाइट तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा धंदा केला जातो. त्यामुळे सावधान राहा.