मुंबई : अनेकदा अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात ज्याबाबत आपल्याला काहीच माहित नसतं पण आपल्याला ती जाणून घेण्याची आवड असते. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेडिकलमधून अनेकदा आपण औषधं आणतो. काही गोळ्यांच्या पाकिटावर काही रिकाम्या जागा असतात. खालील दिलेल्या फोटोमध्य् तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये कोणतीही गोळी नसते तरी ती जागा अशीच रिकामी ठेवलेली असते.


या रिकाम्या जागा देखील गोळ्यांशी संबंधित आहेत. गोळ्या एकमेकांजवळ येऊ नये आणि आपापसात मिसळू नये म्हणून ते पाकीट अशा प्रकारे बनवलेलं असतं. ज्यामुळे केमिकल रिअॅक्शन होत नाही.


औषधांची पाकिटं मेडिकलपर्यंत पोहोचत असतांना त्यांना कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून ही स्पेस ठेवलेली असते. हे औषधांसाठी Cushioning Effect सारखे असतात. यामुळे औषधांचं नुकसान होत नाही.


प्रिंट एरिया वाढवण्यासाठी ही स्पेस वाढवलेली असते. गोळी बद्दल संपूर्ण माहिती प्रिंट करता यावी यासाठी ती स्पेस वाढवण्यासाठी देखील याची मदत होते. काही वेळेस अनेकांना मोजक्याच गोळ्या हव्या असतात तेव्हा ते कापतांना गोळ्यांना नुकसान होऊ नये म्हणून देखील स्पेस मोठी असते.