नवी दिल्ली :  मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवे कॅमेरा फिचर आपल्या अॅपमध्ये समाविष्ट केले आहे. यात तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओवर लिहू शकतात. तसेच त्याला इमोजी जोडू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WhatsAppने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, आज आम्ही आमच्या जगभरात विस्तारलेल्या मित्रांसाठी नवीन फिचर लॉन्च करत आहोत. त्यात शेअर करण्यात येणाऱ्या फोटो आणि व्हिडिओला वैयक्तीक एडिट करण्याची म्हणजे कस्टमाईज करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. 


WhatsAppच्या कॅमेरा फिचरमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओ किंवा फोटोवर लिहू शकतात किंवा त्याला पोस्ट करण्यापूर्वी इमोजी जोडू शकतात. 


युजर्स व्हॉट्सअॅपमधून एखादा फोटो किंवा व्हिडिओ काढला तर तो शेअर करण्यापूर्वी त्याला एडिट करण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.