मुंबई : तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'व्हॉटसअप' असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच होईल. तुमचं लाडकं अॅप 'व्हॉटसअप' जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप बनलंय. 


भारतातही नंबर वन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिसर्चनुसार, जगातील १०९ देशांमध्ये 'व्हॉटसअप' या मॅसेजिंग अॅपनं पहिल्या नंबरवर स्थान मिळवलंय... आणि उल्लेखनीय म्हणजे या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. 


सिमिलरवेबचा अभ्यास


यासाठी डिजिटल मार्केट इंटेलिजन्स कंपनी 'सिमिलरवेब'नं १८७ देशांचा अँन्ड्रॉईड डेटाचा अभ्यास केलाय. त्यावेळी, इतर मॅसेजिंग अॅपच्या तुलनेत 'व्हॉटसअप' जास्त लोकांनी इन्स्टॉल केल्याचं दिसलं. 


तुमच्या डिवाईसमध्येही आहेच की... 


भारतात ९४.८ टक्के अँन्ड्रॉईड डिवायसेसमध्ये व्हॉटसअप इन्स्टॉल असल्याचं दिसलं. भारताशिवाय, ब्राझील, मेक्सिको, यूके, रशिया आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या अनेक देशांमध्ये हेच मॅसेजिंग अॅप टॉपवर आहे.