मुंबई : पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर सध्या एक लिंक व्हायरल होतेय. या लिंकवर व्हॉट्सअॅप आता मल्टिकलरमध्ये असल्याचा दावा करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या व्हॉट्सअॅपवर ही लिंक आलीये हा. आली असेल तर ही लिंक चुकूनही डाऊनलोड करु नका. ही लिंक फेक आहे. जेव्हा यूजर्स या लिंकवर क्लिक करतो तेव्हा स्मार्टफोनच्या ब्राऊजरवर एक वेबसाईट ओपन होते. मात्र ही वेबसाईट व्हॉ्ट्सअॅपची अधिकृत वेबसाईट नाहीये. 


ही वेबसाईट ओपन होताच आपल्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व यूजर्सना ही लिंक सेंड होते. दरम्यान, या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अॅडवेयर अॅप डाऊनलोड होण्याची तक्रारही करण्यात आलीये. त्यामुळे तुमच्याकडे ही लिंक आल्यास चुकूनही या लिंकवर क्लिक करु नका.