ग्रुपमध्ये व्यक्तीला करा `टॅग`; व्हॉटसअपचं नवीन फिचर
व्हॉटसअपनं एक नवीन फिचर आणलंय. यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला `टॅग` करू शकाल.
मुंबई : व्हॉटसअपनं एक नवीन फिचर आणलंय. यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला 'टॅग' करू शकाल.
व्यक्तीला टॅग करा...
म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये चॅटिंग करत आहात... आणि एकाच वेळी अनेक जण त्या ग्रुपमध्ये आपलं म्हणणं मांडत असतील... यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीलाच प्रत्यूत्तर करायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मेन्शन करू शकाल. त्यामुळे, तुम्ही ग्रुपमध्ये नेमकं कुणाला प्रत्यूत्तर केलंय हे कळू शकेल.
आता, ग्रुपमध्ये सध्या एकाखाली एक मॅसेज पडल्यामुळे कोण कुणाशी बोलतंय हेच कळत नाही. त्यामुळे कधी कधी अडचणही जाणवते... तर कधी कधी गैरसमजही होऊ शकतो.
कसं वापरणार हे फिचर...
- ग्रुप चॅटिंगमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला प्रत्यूत्तर द्यायचं असेल त्या मॅसेजवर काही सेकंद होल्ड करून ठेवा.
- आता अॅपच्या वरच्या बाजुला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये रिप्लायच्या आयकॉनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर हा मॅसेज सिलेक्ट झाला असेल.
- आता टायपिंग विंडोमध्ये किबोर्डच्या वर मॅसेज तुम्हाला करड्या रंगाचा बॉक्स दिसेल. याच्या खाली तुम्ही तुमचं उत्तर टाईप करू शकाल.
- उत्तर टाईप केल्यानंतर उजव्या बाजुला दिसणारं सेन्ड बटन टॅप करा. त्यानंतर हा मॅसेज तुम्ही कुणाला उत्तर दिलंय, ते दर्शवेल.
व्हॉटसअपची ही सुविधा सध्या बीटा वर्जनमध्ये दिसतेय. लवकरच अँन्ड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी ही सुविधा सुरू होईल.