मुंबई : व्हॉट्सअॅपवरुन चुकून पाठविलेला मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरतो. तर काहीवेळी अडचणीत मोठी भर घालतो. मात्र, यातून तुमची सुटका होऊ शकते. कारण व्हाट्सअॅपने नवे फिचर आणले आहे, त्यामुळे पाठविलेला संदेश तुम्हाला मागे घेता येऊ शकतो किंवा त्यात बदल करता शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकून पाठविले मेसेज डिलीट किंवा एडिट करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची माफी मागणे एवढा एकच काय तो पर्याय बाकी होता. पण आता व्हॉट्सअपच्या नव्या फिचरमुळे हा मेसेज डिलीट करु शकता किंवा त्यात तात्काळ बदल करू शकता.


व्हॉट्सअॅपव या नव्या फिचरसाठी व्हॉट्सअॅप गेल्या अनेक महिन्यापासून रिव्होक (Revoke) या फिचरवर काम करत आहे. हे फिचर व्हॉट्सअॅपने वेब व्हर्जनवसाठी सुरु केल्याचे समजते. मेसेज पाठविल्यानंतर तो अनसेंड म्हणजेच एडिट किंवा डिलीट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा अवधी असणार आहे.


व्हॉट्सअॅपसंबंधी ही माहिती ट्विटरवर @WABetaInfoने दिली आहे. या ट्विटमध्ये रिव्होक फिचर दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच एक स्क्रिन शॉट लिक केले आहे. ज्यामध्ये अँड्रॉईड बीटा यूजर्स व्हर्जन 2.17.148 वर फॉन्ट शॉटकट असणार असल्याचं म्हटले आहे.