मुंबई : मुले त्यांच्या हेअरस्टाईलबाबत अधिक दक्ष असतात. मात्र योग्य माहितीच्या अभावामुळे ते हेअरस्टाईलबाबत प्रयोग करतात. बऱ्याचदा हे प्रयोग फसतात. आता तुम्हाला हेअरस्टाईल कशी असावी यासाठी सलूनमधील हेअर कटिंग कऱणाऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. तुम्हीच तुमच्या चेहऱ्याला कोणती हेअरस्टाईल सूट करेल हे ओळखू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौकोनी चेहऱ्यासाठी - फुटबॉलपटू डेविड बॅकहमची चेहरेपट्टी काहीशी अशीच आहे. त्यामुळे अशी चेहरेपट्टी असणाऱ्या मुलांनी ही काळजी घ्या की हेअरस्टाईल करताना चेहरा मोठा दिसू नये.


लंबगोल चेहऱ्यासाठी - लंबगोल चेहऱ्यावर कोणतीही हेअरस्टाईल सूट करते. ट्रेंडिगमध्ये असणाऱ्या हेअरस्टाईल हे ट्राय करु शकतात. 


गोल चेहऱ्यासाठी  - गोल चेहरा असलेल्या मुलांनी हेअरस्टाईल करताना आपला लूक बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. समोरचे केस शॉर्ट करण्यापेक्षा ते थोडे मोठे ठेवून त्यांना वेव्ही लूक द्यावा.