मुंबई : मोशन सिनेमे आल्यानंतर लगेचच पॉर्न सिनेमे बनण्यास सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच सेक्सच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता होती. व्हिडिओ कॅमेरा आल्यानंतर लगेचच असे दृष्य चित्रित केले गेले. यानंतर या सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जावू लागलं. भारत, श्रीलंका, इस्राईल, नायजेरिया या देशांमध्ये अडल्ट सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जातं. पण यांना ब्लू फिल्म का म्हटलं जातं हे अनेकांना माहित नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेट ब्रिटनमधून ब्लू फिल्म या शब्दाचा उद्य झाला. हा शब्द तेथे कामूक गोष्टींशी संबंधित गोष्टींसाठी वापरला जात होता. काही अश्लिल आणि घाणऐरड्या गोष्टींसाठी देखील ब्लू या शब्दाचा वापर केला जायचा. ब्रिटनमध्ये आधी ब्लू लॉ म्हणजेच कायदे असायचे. रविवारी धार्मिक कार्यांवेळी दारुविक्री सारख्या वाईट गोष्टींवर प्रतिबंध ठेवण्यासाठी हे कायदे असायचे.


१९९० नंतर भारतात देखील असे सिनेमे मोठ्या प्रमाणात बनू लागले. जगभरात अनेक संस्थांनी असे सिनेमे रोखण्यासाठी प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. भारतात अशा सिनेमांना बंदी आहे पण तरी भारतात अशा सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना भारतात स्विकारलं जातंय. सनी लिऑनने देखील पॉर्न सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि लोकांनी तिला स्विकारलं. त्यामुळे ग्रेट ब्रिटनमध्ये घाण कामांसाठी किंवा कामूक संबधित गोष्टींसाठी प्रचलित असलेला ब्लू हा शब्द पुढे अनेक देशांमध्ये अशा कामूक सिनेमांसाठी वापरला जावू लागला.