रविवारीच सुट्टी का असते?... यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
सध्या कामाच्या ठिकाणी रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असतो. मात्र रविवारीच सुट्टी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई : सध्या कामाच्या ठिकाणी रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असतो. मात्र रविवारीच सुट्टी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
जाणून घ्या यामागचे कारण
ब्रिटिशांच्या काळात कामगारांना सातही दिवस काम करावे लागत असे त्यांना सुट्टी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत. मात्र कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती.
त्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांचे नेते होते. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी 6 दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे कऱण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा हा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
मात्र इंग्रजांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतरही लोखंडे यांचे प्रयत्न कायम होते. अखेर सात वर्षांच्या मोठ्य़ा संघर्षानंतर 10 जून 1890 रोजी रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून आजतायगत रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे.