सावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका...
एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.
मुंबई : एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.
कारण या एटीएम स्लिपवरील माहिती डिकोड करुन हॅकर्स तुमच्या अकाऊंटमधील पैसे साफ करू शकतात. हे डिकोडिंग तसं सोपही नाहीय, या प्रकारच्या घटना नगण्य आहेत, पण काळजी घेतलेली कधीही बरी.
एटीएममधील या स्लिप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, अनेक बँकांच्या स्लिपवर अकाऊंट किंवा कार्ड नंबरचे आधीचे आकडे येतात, तसेच मागील आकडे छापलेले नसतात.
ज्या जागी स्लिपवर फुल्या असतात, त्या ठिकाणाचे आकडे ओळखणं, एक आव्हान सायबर क्रिमिनल्ससाठी असतं. हे कुणाच्याही हाती लागू नये म्हणून आपण आपली स्लिप फाड़ून कचरा पेटीत टाकावी, अथवा पुढील रेकॉर्ड ठेवण्यासाठी सोबत ठेवावी.
एटीएममधील तुमच्या मोठ्या रकमेचं व्यवहार कागदावर घेण्यासाठी स्लिप वापरा, मागचे पुढचे डिटेल्स घेण्यासाठी मिनी स्टेटमेंट घ्या आणि त्याची झेरॉक्स मारा कारण एटीएम स्लिपवरील शाई काही दिवसांनी अस्पष्ट होते, पुसली जाते.