तुम्हाला मोबाईलवर पॉर्न पाहणं पडू शकतं भारी!
चोरून-लपून पॉर्न पाहायचे असतील तर बरेच जण डेस्कटॉपऐवजी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात. आपल्या खाजगी गोष्टी जपण्याचा यातून ते प्रयत्न करतात... पण, खाजगी गोष्टी सोडा, मोबाईलवर पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला भारी पडू शकते.
नवी दिल्ली : चोरून-लपून पॉर्न पाहायचे असतील तर बरेच जण डेस्कटॉपऐवजी आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात. आपल्या खाजगी गोष्टी जपण्याचा यातून ते प्रयत्न करतात... पण, खाजगी गोष्टी सोडा, मोबाईलवर पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला भारी पडू शकते.
भारतामध्ये पॉर्न पाहणं हा काही कायदेशीर गुन्हा नाही. शिवाय, पॉर्नवर भारतात पूर्णत: बंदी घालण्यासाठी कुठला कायदाही नाही. तसंच पॉर्न मोबाईलवर तुम्हाला कधीही आणि कुठेही पाहता येतं.
डोक्याला ताप...
परंतु, हीच गोष्ट तुमच्यासाठी धोकादायक आणि त्रासदायक ठरू शकते. काही पॉर्न वेबसाइट आपल्या फायद्यासाठी बेकायदेशीर व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेसला आपल्या वेबसाईटशी जोडतात. त्यामुळे, जेव्हा तुम्ही चुकून या जाहिरातींवर क्लिक करता तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये या बेकायदेशीर व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस अॅक्टिव्ह होतात.
बॅलन्स आपोआप कमी होतो...
तुम्हाला नको असलेले काही सबस्क्रीप्शनदेखील तुमच्या नंबरवर आपोआप अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे दिवसाला ५ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपये तुमच्या मोबाईल बॅलन्समधून आपोआप कमी होत जातात.
सुरक्षितात धोक्यात
अनेकदा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर तुमच्या प्रायमरी जीमेल अकाऊंटसोबत बँकींग अॅपही असतात. अशावेळी पॉर्न ब्राऊज करणं खूप मोठी रिस्क आहे. कारण, यामुळे तुमच्या अॅऩ्ड्रॉईड स्मार्टफोनमधली खाजगी माहिती आणि सुरक्षितता अनेकदा धोक्यात येऊ शकते.
यातून सुटका मिळवण्यासाठी काय कराल...
सर्वात अगोदर मोबाईलवर पॉर्न पाहणं सोडून द्या... तसंच अगोदरपासून अशा काही व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस मोबाईलवर सुरू असतील तर 'ट्राय'कडून उपलब्ध करण्यात आलेला क्रमांक १५५२२३ वर 'STOP' असा एसएमएस पाठवा. त्यामुळे, तुमच्या मोबाईलवर नको असलेले व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस बंद करू शकता.