मुंबई : चीनची कंपनी शाओमीनं आपला एका नवा स्मार्टफोन 'रेडमी ४' ग्राहकांसमोर सादर केलाय. यासोबतच कंपनीनं 'रेडमी ४ ए' आणि 'रेडमी ४ प्राईम' हे स्मार्टफोनदेखील बाजारात आणलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रेडमी ४' आणि 'रेडमी ४ प्राईम'च्या प्री ऑर्डर सुरू झाल्यात आणि याची पहिली विक्री सोमवारी होईल तर दुसरीकडे 'रेडमी ४ ए'ची विक्री ११ नोव्हेंबरपासून सुरू होईल. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मेटल युनिबॉडी आणि २.५ डी कर्व्ड ग्लास देण्यात आलाय. दोन्ही फोन ड्युएल सिम देण्यात आलेत. तसंच यांच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलाय.


'रेडमी ४'चे फिचर्स 


- स्क्रीन : ५ इंच (७२० X १२८० पिक्सल रिझॉल्युशन)


- प्रोसेसर : १.४ गिगाहर्टझ ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३०


- रॅम : २ जीबी


- Adreno 505 GPU


- रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)


- फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल (एलईडी फ्लॅशसहीत)


- इंटरनल मेमरी : १६ जीबी (१२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते)


- कनेक्टिव्हिटी : ४जी LTE, वाय-फाय ८०२.११, ब्लूटूथ, जीपीएस


- बॅटरी : ४१०० mAH (फास्ट चार्जिंगची सुविधा)


- किंमत : 'रेडमी ४' ची किंमत जवळपास ६,९०० रुपये असेल


'रेडमी ४ प्राईम'चे फिचर्स


- स्क्रीन : ५ इंच (१०८० X १९२० पिक्सल  रिझॉल्युशन)


- 2GHz ऑक्टाकोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 625 चिपसेट


- रॅम : ३ जीबी


- इंटरनल मेमरी : 32 जीबी (१२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते)


- किंमत : 'रेडमी ४ प्राईम' ची किंमत जवळपास ८,९०० रुपये असेल


'रेडमी ४ ए'चे फिचर्स 


- स्क्रीन : ५ इंच (७२० X १२८० पिक्सल रिझॉल्युशन)


- ड्युएल सिम हायब्रिड स्लॉट


- प्रोसेसर : १.४ GHz क्वार्ड कोर स्नैपड्रैगन ४२५


- रॅम : २ जीबी


- रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल  


- फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल  


- किंमत : 'रेडमी ४ ए'ची किंमत जवळपास ४,९०० रुपये असेल