नवी दिल्ली : तुम्ही आत्तापर्यंत २ जीबी किंवा ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन पाहिला असेल... सध्या ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पण, आता ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी एक चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी सज्ज झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायवो (VIVO) ही चायनीज मोबाईल निर्माता कंपनी आपल्या 'एक्स प्ले ५'  हॅन्डसेटसहीत लवकरच बाजारात येणार आहे. हा नवीन स्मार्टफोन आपल्या अनोख्या फिचर्ससहीत १ मार्च रोजी बाजारात येण्याची शक्यता आहे. 


या स्मार्टफोनचं वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये ६ जीबीचा रॅम उपलब्ध असणार आहे. तसंच यात स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसरही असेल. त्यामुळे, इंटरनेट हाताळणं खूप सहज होणार आहे. 


या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे... हा स्मार्टफोन सोलार एनर्जी म्हणजेच सौरऊर्जेवरही चार्ज केला जाऊ शकतो. या फोनच्या दोन बाजू गोलाकार असतील असं कंपनीनं अगोदरच जाहीर केलं होतं. 


'एक्स प्ले ५'ची वैशिष्ट्ये...


  • ऑपरेटिंग सिस्टम - अॅन्ड्रॉईड मार्शमॅलो

  • रॅम - ६ जीबी

  • डिस्प्ले - ६ इंच

  • कॅमेरा -  १६ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा - ८ मेगापिक्सल

  • बॅटरी - ४३०० मेगाहर्टझ