मुंबई : सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीवर आधारित सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या, मेसेजेस फिरतायत. तसेच अनेक फोटोही व्हायरल होतायत. याचदरम्यान वरील फोटोही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरतोय. राजस्थानातल्या मोठ्या व्यापाऱ्याकडे 13 कोटींचा काळा पैसा आढळल्याची बातमी सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच व्हायरल झालीये. दरम्यान हा फोटो मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतरही नाहीये तर एक वर्षापूर्वीचा आहे.


राजस्थानातील मार्बल व्यापा-याकडून ही रक्कम आयकर विभागाकडून वर्षभरापूर्वी जप्त केली होती. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हे छापे टाकण्यात आले होते. त्याचा हा फोटो आहे.