मुंबई : लग्न हे दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबाचे बंधन असते असे म्हटले जाते. लग्न हे नेहमी विश्वासावरच टिकते. नवरा आणि बायकोचा एकमेकांवर विश्वास असायला हवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसाररुपी रथाचा वेग कायम राखण्यासाठी नवरा आणि बायको ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागते. यातील एक जरी निखळले तरी संसाररुपी रथ कोलमडतो. नात्याचे तसेच असते. नवरा आणि बायको यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते. लग्न म्हणजे थोडीशी अॅडस्टमेंट, एकमेकांना समजून घेणे, थोडीशी तडजोड. मात्र ती दोन्हीकडून होणे आवश्यक असते. तरच लग्न टिकते. 


लग्नानंतरचे नऊलाईचे नऊ दिवस चांगले असतात. मात्र त्यानंतर पार्टनरच्या गोष्टी आपल्याला खटकू लागतात. मात्र त्यावेळी समोरच्याला ती गोष्ट योग्य रितीने पटवून देता आली पाहिजे. नाहीतर नाते तुटायला वेळ लागत नाही.


या आहेत ५ गोष्टी ज्या लग्नाचे बंधन टिकवून ठेवण्यात मदत करतात


1. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी जोडीदाराचे मत नक्की विचारात घ्या. परस्पर कोणताही निर्णय़ घेऊ नका. 


2. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. त्यामुळे नवरा-बायकोत भांडण झाल्यास ती चूक दोघांचीही असते. त्यामुळे दोघांनी आपापली चूक मान्य करुन एकमेकांस माफ करणे गरजेचे असते. 


3. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. पती-पत्नी जरी एक असले तरी माणूस म्हणून ही विभिन्न व्यक्तिमत्वे असतात. त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका. 


4. लग्नसंबंधात काही अडथळे आल्यास घरातील जवळची व्यक्ती, अथवा मैत्रीण-मित्र यांच्याशी बोलून समस्या दूर कऱण्याचा प्रयत्न करा. 


5. अनेकदा जवळ राहून संबंध बिघडण्यापेक्षा लांब राहणे चांगले. दुराव्याने प्रेम वाढते. यामुळे नाते अधिक दृढ होते.