सॅन फ्रॅन्सिस्को : व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन पिढीच्या हातात स्मार्टफोन इंटरनेटच्या प्रसारामुळे आला, बातम्या, मनोरंजन आणि संगीताच्या आस्वाद घेण्यासाठी नवीन पिढी स्मार्टफोनचाच आधार घेते, त्यातल्या त्यात सर्वात जास्त नवीन पिढी ही यू-ट्यूबवरच असते.


यात सर्वात महत्वाचं म्हणजे, नवीन जाहिरातदारांना आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यू-ट्यूब हे सर्वात प्रभावी वाटतंय. यू-ट्यूब गरजू लोकांपर्यंत थेट जाहिरात पोहोचवत असल्याने जाहिरातदारांचा कल यू-ट्यूबकडे वाढला आहे.