मुंबई : लोकांची फसवणूक करणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. आता फेसबूकही फसवणूक करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आहे. जी सोशल नेटवर्किंग साइट अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे त्यावरुन देखील आता तुमची फसवणूक होऊ शकते. हॅकर्सने आता फेसबूकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे तुमच्या फेसबुक प्रोफाइलच्या माध्यमातून गायब केले जावू शकता. सोशल मीडियावर व्हायरल एका मॅसेजच्या माध्यामातून हा दावा करण्यात आला आहे.


हॅकर सगळ्यात आधी तुमच्या नावाचं एक खोटं पॅनकार्ड काढतात. आणि त्याच्या माध्यमातून एक खोटं सिम कार्ड मिळवतात. मग बँकच्या साईटवर जावून forgot my password option वर जावून तुमच्या अकाऊंटसोबत छेडछाड करु शकतात. त्यानंतर इंटरनेट बँकिंगचा पिन ते मिळवतात. अशा प्रकारे हॅकर्स तुमचं बँक अकाऊंटमधले पैसे साफ करु शकतात.