या टिप्सचा वापरा तुमच्या फोनची बॅटरी कधी लो होणार नाही
स्मार्टफोनमध्ये सगळ्यांनाच सतावणारी समस्या म्हणजे वारंवार लो होणारी बॅटरी. दिवसभर इंटरनेटचा वापर, चॅटिंग, सर्फिंग यामुळे बॅटरी लवकर लो होते. वारंवार चार्जिंग करावी लागते. मात्र काही साध्या टिप्सचा वापर केल्यास तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये सगळ्यांनाच सतावणारी समस्या म्हणजे वारंवार लो होणारी बॅटरी. दिवसभर इंटरनेटचा वापर, चॅटिंग, सर्फिंग यामुळे बॅटरी लवकर लो होते. वारंवार चार्जिंग करावी लागते. मात्र काही साध्या टिप्सचा वापर केल्यास तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
वारंवार बॅटरी लो होत असेल तर या टिप्स वापरा
स्मार्टफोनचे व्हायब्रेशन बंद करा. व्हायबर मोडमध्ये रिंगिंग मोडपेक्षा अधिक बॅटरी खर्च होते.
स्मार्टफोनवर अनेक अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. या अॅपच्या वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे बॅटरी अधिक खर्च होते.
वॉलपेपरमुळे बॅटरी अधिक खर्च होते. बॅटरी लो होऊ नये साधारण वॉलपेपर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ठेवावे.
फोनची डिस्प्ले लाईट कमी ठेवल्यास बॅटरीची बचत होते.
मोबाईल कधीही उष्णतेजवळ ठेवू नका. यामुळे बॅटरीची क्षमता कमी होते.
वायरलेस चार्जर नेहमी बाळगा. जेव्हा कधी तुम्ही बाहेर प्रवासात असता तेव्हा अनेकदा चार्जिंगची सुविधा नसते. यावेळी वायरलेस चार्जरचा फायदा होतो.
जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरणार नाही आहात तेव्हा नेहमी वायफाय डिसेबल करा.