मुंबई : तरुणांच्या संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देत त्यांचं संशोधन जगभरात पोहचवण्यासाठी मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी झी २४ तासने सुरु केलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्डचे हे दुसरं वर्ष. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या भन्नाट संशोधनांना झी २४ तासने या अवॉर्डद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 


यावर्षी विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आज संध्याकाळी ५.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात होणार आहे.


 माननीय राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई अशा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे. 


तरुणाईच्या या अफाट बुद्धीमत्तेचा सन्मान करण्यासाठी, कल्पक आणि सर्जनशील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.