नाशिक: सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत मुलीचे नाव आराध्या खडपे असे आहे. खडपे कुटुंबीय चार दिवसांपूर्वीच शिवाजीनगरमध्ये राहायला आले होते. घरातील सामान जागेवर न लागल्यामुळे आराध्यासाठी तात्पुरती झोळी बांधण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपेत असताना या झोळीतून आराध्या खाली पडू नये, यासाठी तिच्या पोटाला स्कार्फ बांधण्यात आला होता. आराध्याला झोळीत ठेवून तिची आई काम करत होती. काम करत असल्यामुळे आराध्या जागी झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले नाही. 


झोळीत जास्त हालचाल केल्यामुळे आराध्या खालच्या बाजूला सरकली. यामुळे पोटाजवळ बांधलेला स्कार्फ तिच्या गळ्याभोवत गुंडाळला गेला. याचा फास बसून आराध्याचा मृत्यू झाला. या घटननेमुळे शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.