Jalgaon News : जन्म आणि मृत्यू कोणच्याच हाती नसतो. जळगावमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या बर्थ डे  सेलिब्रेशन ऐवजी तिच्या कुटुंबियांना अत्यंविधीची तयारी करावी लागली. हसत्या खेळत्या मुलीच्या एका झटक्यात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


अवघ्या काही क्षणात मुलीला मृत्यूने गाठले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी चेतन सनांसे असे मृत बालिकेचे नाव आहे. वैष्णवीचा नववा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. तिचे कुटुंबिय घरात तिच्या वाढदिवसाची जोरदार तयारी करत होते. घरात सेलिब्रेशनची तयारी सुरु असताना वैष्णवीला मृत्यूने गाठले.


कसा झाला मृत्यू?


वैष्णवी घरात खेळत असताना कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच वैष्णवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केले. वाढदिवसा दिवशीच वैष्णवीचा मृत्यू झाला आहे.  या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


नाशिकमध्ये वाढदिवसाच्या दिवशीच तीन वर्षांचा चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू


नाशिकमध्ये वाढदिवसाच्या दिवशीच तीन वर्षांचा चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्यानं या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अवधूत वाघ असं या मुलाचं नाव आहे.  पालकांच्या दुर्लक्षेमुळे नाशिकमध्ये आणखी एका चिमुकल्याचा अंत झाल्याची ही घटना आहे. एका बाजूला वाढदिवसाची तयारी सुरू असतांना ही घटना दुसऱ्या बाजूला घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. 


वाढदिवसाला वापरल्या जाणाऱ्या मेणबत्तीने घात केला


धुळ्यातल्या चिखलीपाडा गावात मेणबत्ती कारखान्यात भीषण आग लागली होती. यात होरपळून चार महिलांचा मृत्यू झाला, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या होता. वाढदिवसाच्या मेणबत्त्या बनवण्याचं काम या महिला कामगार करत होत्या. अचानक शॉर्ट सर्किटमूळे कारखान्यात आग लागली होती. 


आई केक आणण्याकरता बाजारात गेली होती


लातूरमधल्या देवणी तालुक्यातील भोपणी इथल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. धीरज दत्ताजी मोरे आणि प्रणव राम मोरे अशी बारा वर्षांच्या या दोघांची नावं आहेत. हे दोघेही घरात एकुलते एक होते. पाझर तलावातल्या गाळात रुतून त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे गाळात बुडत असताना इतर दोन मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र मदतीसाठी गावकरी येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. यापैकी धीरजचा वाढदिवस असल्यानं, त्याच्यासाठी कपडे आणि केक आणण्याकरता त्याची आई बाजारात गेली होती. मात्र वाढदिवशीच काळानं धीरजवर झडप घातली.