वाल्मिक जोशी, जळगाव : मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळी ही भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता त्यामुळे तेंव्हा पासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. व्हीपी सिंग यांचा पाठिंबा काढला आणि ते सरकार कोसळलं ते एकाच मुद्यावर कोसळलं होत. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले? अशी विचारणा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 ला ओबीसींची जात निहाय गणना झाली. जन गणना केंद्र सरकार करीत असल्याने डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. हा डाटा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणीस यांनी मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे. तशी पंकजा मुंडे यांनीही ही अशा प्रकारची मागणी केली होती. मात्र दिल्लीत भाजपच सरकार असताना आणि तुम्ही राज्यात सत्तेत असताना तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे. हा सर्व प्रकार खोटारडेपणा आहे. या सर्व प्रकाराला तुम्हीच जबाबदार असून तुम्ही ओबीसीची दिशाभूल करीत आहात असा आरोपही खडसे यांनी केला आहे.


ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. यासाठी ओबीसींची जन गणना कशी करायची? त्यांना आरक्षण कसं मिळून द्यायचं? त्याची तुम्ही सूचना करा/ मात्र तसे न करता तुम्ही म्हणता, मला सत्ता द्या मग मी तुम्हाला देतो , याचा अर्थ तुम्ही सत्तेसाठी हापापले आहात हे लक्षात येते.


ओबीसींना आरक्षण देण्यासाथी राज्य सरकारने आता पावले उचलली असून त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. त्यासाठी अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. राज्य सरकार OBC ची जनगणना करण्यासाठी सूचना करू शकणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. आकडेवारी आली की काम होणार असले तरी इतके वर्ष वाया गेले आहेत. मागच्या काळातच मोदी यांनी डाटा दिला असता तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ही ओबीसींना आरक्षण मिळू शकले असते. सुप्रीम कोर्टाने पूर्वी निर्णय दिला आहे. त्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. परंतु ओबीसींचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना फेकून द्यायचे अशी युज अँड थ्रो ची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे. 


 देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ओबीसी आरक्षण संदर्भात संन्यास घेण्याचे म्हटले आहे भाषा केली आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी संन्यास घेण्याच्या भाषा अगोदरही केल्या आहेत. विदर्भाचा आंदोलन सुरू असताना त्यांनी त्यावेळी म्हटलं होत की, विदर्भ जर वेगळा झाला नाही. तर मी लग्न करणार नाही. तसे काही झालेले दिसले नाही. असा उपरोधिक टोला देखील खडसे यांनी लगावला आहे.