वाल्मिक जोशी, जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशलमीडियावर वायरल होत आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हे प्रमाणपत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दिनांक 6 सप्टेंबर रोजी जळगाव आरोग्य विभागाकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. हे प्रमाणपत्र आज भाजपचे नेते गिरिश महाजन यांनी मीडियासमोर दाखवले. यावेळी ते म्हणाले की, ' अनेक प्रयत्न करून देखील सामान्य लोकांना अपंग प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. एकनाथ खडसे यांना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे?' असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे. 


खडसेंच्या अपंग प्रमाणपत्राबाबत आपली हरकत नसून कदाचित त्यांना अपंगत्व आले असावे अशी मिश्किल टीका देखील त्यांनी केली.


स्पायनलची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना 60 टक्के अपंगत्व आले असल्याचे संबधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे.