Gautami Patil On Indurikar Maharaj : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) यांनी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)  हिच्यावर निशाणा साधला होता.   गौतमी पाटील कार्यक्रमासाठी घेत असलेल्या मानधनावर इंदुरीकर महाराजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. एका शो साठी किती मानधन घेते?  इंदुरीकर महाराजांच्या आरोपानंतर गौतमी पाटीलने याबाबतचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आक्षेपार्ह डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत आली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते. ही गर्दी नियंत्रणात आणता आणता पोलिसांच्या नाकी नऊ येते. गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. लाखो तरुणांच्या ह्रदयाची धडकन गौतमी पाटीलवर अशा शब्दात इंदुरीकर महाराज बरसले.


एका कार्यक्रमासाठी गौतमी तब्बल तीन लाखांच्या पुढे रक्कम घेते. लोकही एवढी रक्कम देऊन तिचा कार्यक्रम आयोजित करतात. यावरुनच इंदुरीकर महाराजांनी आपली खदखद बोलून दाखवली. बीडनंतर शिर्डीतही इंदुरीकरांनी नाव न घेता गौतमीवर निशाणा साधला होता. 


बीडनंतर शिर्डीमध्ये कीर्तनादरम्यान इंदोरीकर महाराजांनी नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता.  कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला म्हणतात आणि तीन गाण्यांवर नाचण्यासठी लोकं दीड लाख रुपये देतात अशी टीका इंदूरीकरांनी केली होती. 


इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेचा मात्र सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी समाचार घेतला होता. गौतमी पेसे कमावते तर इदुरीकरांच्या पोटात का दुखतं? असा सवाल त्यांनी केला होता.


माझ्या कार्यक्रमासाठी कोणीही पाच लाख रुपये देत नाही


लोककलावंत गौतमी पाटील हिच्या शोची शोसाठी लोक पाच लाख रुपये मोजतात मात्र तमाशा कलावंतांसाठी दोन लाख देखील मिळत नसल्याची खंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.  मात्र, असं काही नाही. हा गैरसमज असल्याचं गौतमी पाटीलचे म्हणणे आहे. आपल्या मानधनाबाबत मोठे गैरसमज आहेत माझ्या कार्यक्रमासाठी कोणीही पाच लाख रुपये देत नसल्याचं स्पष्टीकरण गौतमीने दिले आहे.