वाल्मिक जोशी, जळगाव :  जळगाव शहर पोलीस दलाच्या १२८ पोलीस शिपाईच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरती २०१९ मधील उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली असून, या परीक्षेत दोन उमेदवार गैरप्रकार करताना आढळून आल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील एका उमेदवार व्हाट्सअप वर प्रश्न उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आले होते. 


आज जळगाव जिल्ह्यासाठी पोलिस शिपाई भरती २०१९ ची लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेत परीक्षा केंद्र नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज, बांभोरी येथील प्राध्यापकांच्या फिर्यादीवरून परीक्षार्थी उमेदवार योगेश रामदास आव्हाड, रा. पानझणदेव, नागापूर, नांदगाव जिल्हा नाशिक या उमेदवाराला मोबाईल बाळगून मोबाईल द्वारे व्हाट्सअप वर प्रश्न पाठवून उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्न केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


तसेच जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद हा परीक्षेत गैरप्रकार करत असताना निदर्शनात आला असून याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे.