सावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Larvae found in cough syrup : प्रत्येक घरात कफ सिरप असतेच. सर्दी झाली असू किंवा खोकला त्याच्यावर हमखास कफ सिरपचा वापर केला जातो. मात्र हेच कफ सिरप लहानग्यांसाठी घातक ठरत असल्याचे दिसून आले आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या एका लहान मुलाला कफ सिरप देण्यात आले. मात्र, त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधित महिलेने ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे लहान मुलांना हे औषध दिले जात असून सरकार आदिवासी मुलांशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले. तसेच नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा अन्य ठिकाणी देखील गेला असेल तर तो सिल करण्यात यावा आणि या संबंधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आले. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत असतात. परंतु जिल्हा प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.
सिरपमुळे गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका
WHO ने म्हटले आहे की हे, सर्व सिरप असुरक्षित आहेत आणि त्यांच्या वापरामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकतो. विशेषतः लहान मुले याचे सेवन केल्याने ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, जुलाब, लघवी करण्यासा समस्या, डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
दरम्यान, WHO या औषधांची फार्मास्युटिकल कंपनी आणि भारत सरकारच्या नियामक प्राधिकरणांकडे चौकशी करत आहेत. आतापर्यंत चार खोकल्यांचे औषधे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे. या कारणास्तव, जगातील इतर देशांना सावधगिरीचे संकेत जारी करण्यात आले आहेत.
मुलांना हे कफ सिरप देणे टाळा
प्रोमेथाझिन ओरल सोल्यूशन
कोफेक्समालिन बेबी कफ सिरप
मेकॉफ बेबी कफ सिरप
मॅग्रिप एन कोल्ड सिरप