नाशिक: मालवाहतूकदारांचा संप चिघळल्याने ग्रामीण भागातील वाहतूकदार शेतीमालाची वाहतूक करायला धजावत नाहीत. त्याचा परिणाम कांद्याच्या  देशांतर्गत   वाहतुकीवर झाला आहे. लासलगाव कांदा बाजारपेठ लिलावानंतर घेतलेला कांदा ठेवायचा कुठे,  असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याबाहेर कांदा पाठवण्यासाठी ट्रक उपलब्ध नाहीत. त्यामुळं व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावात सहभागी न होण्याचा  घेतला आहे. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे.


शेतकऱ्यांचा कांदा  शेतात तसेच चाळीत पडून आहे. हा संप लवकर न मिटल्यास कोट्यवधी रुपयांच्या कांद्याचं  नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ट्रक चालकांच्या संपाचा फटका  नाशिकच्या कांदा बाजाराला बसला आहे. संपामुळं नाशिक बाजार समितीत जवळपास  चार लाख क्विंटल कांदा पडून आहे. त्यामुळं नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर घसरु लागले आहेत.