निफाड: जागतिक भूक निर्देशांकात ( Global Hunder Index) भारताची मोठी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर खरमरीत टीका केली. भाजपच्या काळात जगभरात देशाची सर्वाधिक बेइज्जती झाल्याचे त्यांनी म्हटले. भारतापेक्षा नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानातही मुलांना अधिक अन्न मिळते. ही बातमी भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी चांगली आहे का?, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. ते गुरुवारी निफाड येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी जागतिक भूक निर्देशंकाचा मुद्दा उपस्थित केला. जो देश अन्नधान्याची निर्यात जगात करतो, त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही, अशी बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येणे हे फारच लाजिरवाणे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आपण सरकारला बदलले पाहिजे, असे पवारांनी म्हटले. 


'काश्मीरमधून ३७० हटवला तसा मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार'


यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही समाचार घेतला. भारताची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नरांमुळे डबघाईला आली आहे, असे वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात केले होते. मात्र, परदेशात जाऊन देशातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल अशाप्रकारची टीका करणे योग्य नाही. एवढी जाणही तुम्हाला नाही का, असा सवाल पवारांनी विचारला. 


शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- मोदी