VIDEO: सचिन तेंडुलकरबरोबर डिनर की धोणीसोबत ट्रेनिंग? ऋतुराज गायकवाडच्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली
पाहा रॅपिड फायर राऊंडला क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने कशी दिली उत्तरं
Cricket News : भारतीय क्रिकेट संघाचा (Team Inia) सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या झिम्बाब्वे (zimbabwe) दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऋतुरजाला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. तिसऱ्या सामन्यात ऋतुराजला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्याला बेंचवरच बसावं लागलं.
दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विटर अकाऊंटवर ऋतुराज गायकवाडचा रॅपिड फायर प्रश्नांचा (Rapid Fire Question) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जात ऋतुराजला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. ऋतुराजनेही या प्रश्नांची अगदी योग्य उत्तर देत चाहत्यांची मनं जिंकलीत. यापैकीच एक प्रश्न होता तुला सचिन तेंडुलकरबरोबर डिनर करायला आवडेल की महेंद्रसिंग धोणीबरोबर ट्रेनिंग करायला?
रॅपिड फायरमध्ये कोणते प्रश्न?
रॅपिड फायर राऊंडच्या सुरुवातीलाच ऋतुराजला त्याचा आवडता पदार्थ कोणता असा प्रश्न विचारण्यात आला यावर ऋतुराजने डोसा असं उत्तर दिलं. तर क्रिकेटर झालो नसतो तर कदाचित टेनिस खेळाडू व्हायला आवडलं असतं, असंही ऋतुराजने या मुलाखतीत सांगितलं.
यावर टेनिसमधले दिग्गज खेळाडू राफेल नदाल कि नोवाक जोकोविचला भेटायला आवडेल असं विचारण्यात आलं. पण ऋतुराजने या दोघांचंही नाव न घेता रॉजर फेडरर आपला आवडता टेनिस खेळाडू असून त्याला भेटायला नक्की आवडेल असं उत्तर दिलं.
सचिन तेंडुलकर की धोणी
यानंतर ऋतुराजला सर्वात अवघड प्रश्न विचारण्यात आला. सचिन तेंडुलकरबरोबर डिनरला जायला आवडेल की एमएस धोणीबरोबर ट्रेनिंग सेशन करायला आवडेल असं ऋतुराजला विचारण्यात आलं. यावर त्याने दिलेल्या उत्तराने चाहतेही आनंदी झाले. ऋतुराजने सांगितलं आधी एमएस धोणीबरोबर ट्रेनिंग सेशन करेन आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरबरोबर डिनरला जाईन.
याशिवाय ऋतुराजने आपल्या मुलाखतीत सांगितलं मैदानावर आपल्याला स्पिनर्सपेक्षा फास्ट गोलंदाजांना खेळायला जास्त आवडतं. आपल्या ऑल टाईन फेवरेट क्रिकेटर्समध्ये ऋतुराजने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित श्रमाचं नाव घेतलं. फेव्हरेट फलंदाज म्हणून इशान किशनला पंसती दिली. तर लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आपलं कसोटी पदार्पण व्हावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली.