७ वर्ष, ७ क्षण...जे तुमच्या अंगावर काटा आणतील

Mon, 02 Apr 2018-12:45 pm,

२ एप्रिल २०११ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी भारताने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टरसाठी हा क्षण अनमोल होता. फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. 

 

२०११ क्रिकेट वर्ल्डकपची फायनल श्रीलंका आणि भारत यांच्यात वानखेडे मैदानात रंगली. मुंबईत २ एप्रिल २०११मध्ये हा सामना झाला होता. याआधी १९८३ आणि २००३मध्ये भारत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. 

 

विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनलमध्ये श्रीलंका संघाला ६ विकेटने हरवत २८ वर्षांनी दुसऱ्या आयसीसी वर्ल्डकप जिंकला. 

 

श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ६ विकेट गमावत २७४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने १० चेंडू राखत ४ विकेट गमावत २७७ धावा केल्या. 

 

 

जेव्हा भारताला जिंकण्यासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज होती. धोनीने या क्षणाला तेच केले जे तो नेहमी करतोय. त्याने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकत भारताला वर्ल्डकप मिळवून दिला. 

 

 

फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी नाबाद ९१ धावा केल्या. यात धोनीला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. 

 

युवराज सिंगला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा खिताब मिळाला होता. युवराजने क्रिकेट वर्ल्डकप २०११मधील ९ सामन्यांमध्ये ३६२ धावा केल्या. होत्या. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १५ विकेटही मिळवल्या होत्या. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link