रक्त वाढवण्यासाठी ५ पदार्थ ठरतात फायदेशीर

Tue, 02 Apr 2019-4:37 pm,

खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्याचा वापर आहारात अनेक प्रकारे केला जातो. रक्ताची कमतरता भरून काढायची असल्यास दूधात खजूर मिसळून प्यावे. खारीक पूडदेखील फायदेशीर आहे. म्हणून सलाड किंवा दूधातदेखील खारीक पूड मिसळू शकता. खजूराचे बॉल्स, रोल्स हे झटपट होणारे गोडाचे पदार्थही फायदेशीर आहेत.

पालक हे आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून समजले जाते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पालकचा रस नियमित प्यायल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याचा वेग बळावतो. 

हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवण्याचा हमखास रामबाण उपाय म्हणजे सफरचंद. सफरचंदासोबत मध मिसळून खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. आहारात सलाडपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करता येऊ शकतो. सकाळी नाश्ताला बीटाचा रस, पराठे यांचा समावेश केला जाऊ शकतो.

रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. डाळिंब रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा थेट खाणं अधिक फायदेशीर आहे.

रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते. स्वास्थ्यकारक आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या वाढण्याचा धोका असतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने नैसर्गिकरित्या रक्त वाढू शकते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link