उत्कृष्ट अभिनय ते दिग्दर्शन; Cannes महोत्सवातील `हे` 6 दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच

गायत्री हसबनीस Wed, 17 May 2023-8:51 pm,

यावर्षी अनुराग कश्यरपचा 'केनेडी' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट यावर्षीच्या कान्स महोत्सवासाठी निवड्यात आला आहे. 

(Photo: Kennedy Trailer/YouTube)

विकी कौशलचा पहिला चित्रपट 'मसान' हाही पाहण्याजोगा आहे. स्मशानभुमीवर काम करणाऱ्या एका मुलाची कथा यातून समोर येते. 

(Photo - Zee News)

इरफान खानचा 'द लॅंचबॉक्स' हा चित्रपट खूप गाजला होता. लॅंचबॉक्समधून येणाऱ्या आणि त्यातून गुंफत जाणार नातं यावरील हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरजंन करतो. 

(Photo - Zee News)

यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या 'एस्ट्रॉईड सिटी' चित्रपटाची सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे. हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवातही यावर्षी झळकणार आहे. हा चित्रपट वेगळ्या धर्तीवर आहे. एक ज्युनिअर स्टारगेझर कन्वेन्शन 3007 BC या साली एक धूमकेतू पृथ्वीवर आढळ्यानं त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केले जाते.  परंतु नक्की ही स्पर्धा काय आहे याचा खुलासा या चित्रपटातून होईल. 

(Photo: Asteroid City Trailer/YouTube)

एक मॉडेल आणि त्याची गर्लफ्रेंड एका क्रुझवर अडकतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडते? यावर हा सिनेमा आहे. 'ट्रॅगल ऑफ सॅडनेस' हा चित्रपट पाहण्याजोगा आहे. 

(Photo - Zee News)

ऑस्ट्रिय़ाच्या एका राजघराण्यातील एका राजकुमारीची ही कथा आहे. यावेळी तिनं रॉयल ड्यूटीपासून बंड पुकारते आणि स्वत:चेच आयुष्य स्वत: जगायचा प्रयत्न करते. 'कॉरसेज' हा चित्रपट त्यावर बेतलेला आहे. 

(Photo: CORSAGE Trailer/YouTube)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link