PHOTO VIRAL : खऱ्याखुऱ्या आयुष्यातील राजकुमारी लग्नानंतर अभिनय सोडून जगतेय असं आयुष्य

Wed, 25 Jan 2023-11:39 am,

(Mohena Kumari) मोहेना रेवा प्रांताची राजकुमारी आहे. पण, अभिनयावरील प्रेमापोटी तिनं कलाजगतामध्ये पाय ठेवला. रिअॅलिटी शोमागोमाग तिच्या वाट्याला एक मालिकाही आली. मोहेनाचा चेहरा घराघरात पोहोचला आणि तिला प्रचंड प्रेक्षक पसंती मिळाली. पण, फार कमी वेळातच तिनं या कारकिर्दीला रामराम ठोकला. 

उत्तराखंडचे (Utatrakhand) पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांचे सुपूत्र सुयश यांच्याशी लग्नबंधनात अडकल्यानंतर मोहेनाचं एक नवं आयुष्य सुरु झालं. 

लग्नानंतर तिनं कुटुंब आणि कुटुंबाच्या मानसन्मानाला केंद्रस्थानी ठेवलं. बऱ्याचदा ती कौटुंबीक समारंभांमध्ये पारंपरिक वेशामध्ये दिसू लागली. 

मोहेनाचा ग्लॅमरस लूक फार मागे पडला असला तरीही तिनं शाही थाटात पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत

सुंदर साड्या, त्यावर साजेसे दागदागिने अशा रुपात ती हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर येते. मोहेना डान्स व्लॉग्समधून तिची कलाही जोपासताना दिसते. 

हो पण, हे सर्वकाही सुरु असताना कलाजगताशी असणारं तिचं नातं अजिबात तुटलेलं नाही. आपण त्या विश्वातही रमत होतो असं सांगणाऱ्या मोहेनानं येत्या काळात एखाद्या मालिका किंवा शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link