`वंदे साधारण` नव्हे आता `अमृत भारत एक्सप्रेस` म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या

Pravin Dabholkar Sun, 26 Nov 2023-7:39 am,

Amrit Bharat Express: ​​वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या वंदे साधारण ट्रेनला आता अमृत भारत एक्सप्रेस असे संबोधले जाणार आहे वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनने भारतीयांचा प्रवास अधिक चांगला आणि वेगवान बनवण्याचे काम केले आहे. आता अमृत भारत एक्स्प्रेसही कामगिरी करणार आहे.

स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणार्‍या देशातील कामगार आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना करण्यात आली आहे. आता त्यांना कमी पैशात वंदे भारत प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. अमृत ​​भारत एक्स्प्रेसचे भाडे सामान्य गाड्यांपेक्षा केवळ 15 टक्के जास्त असेल, असे सांगण्यात येत आहे.

देशातील पहिली अमृत भारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. या पुश-पुल ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. या पुश-पुल तंत्रज्ञानाच्या मदतीने वंदे भारत आणि ईएमयू ट्रेनचा वेग वेगाने वाढतो. 

22 डब्यांची ही ट्रेन राजधानी, शताब्दी आणि वंदे भारतच्या धर्तीवर ताशी 130 किलोमीटर वेगाने धावेल. अमृत ​​भरत वेगाने पिकअप घेईल, असे  रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल. फक्त स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

देशातील पहिली अमृत भारत दोन मार्गांवर सुरू होणार आहे. या गाड्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी चालवल्या जातील. याशिवाय दक्षिणेकडील राज्यांनाही ही सुविधा मिळू शकणार आहे.

अमृत ​​भारत एक्सप्रेस ट्रेन वंदे भारतपेक्षा अनेक प्रकारे वेगळी असेल. 800 किमी वरील लांब पल्ल्याच्या प्रवासात याचा वापर केला जाईल. शिवाय, दिवसा आणि रात्रीच्या सहलीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. 

यात 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link