Ashadhi Ekadashi: कर्नाटकातील शितोळे अंकलीतून माऊलींच्या अश्वांचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान

Wed, 31 May 2023-3:34 pm,

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माऊलींच्या मानाच्या अश्वांनी आज (31 मे 2023 रोजी) श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केलं. श्रीमंत शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून हे अश्व रवाना झाले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून झाले.

यावेळी श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार,  महादजीराजे  शितोळे सरकार , युवराज विहानराजे शितोळे सरकार, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर,  अजित परकाळे, निवृत्ती चव्हाण. माऊली गुळुजकर,  विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

आज म्हणजेच 31 मे रोजी या पालखीचा मुक्काम मिरजमध्ये असेल. दुसऱ्या दिवशी मिरज ते सांगली अंतर कापून मुक्काम सांगलवाडीतील राम मंदिरमध्ये केला जाईल. तिसरा मुक्कम इस्लामपूर, चौथा वाहगाव, पाचवा मुक्काम भरतगावात केला जाईल.

5 जून रोजी पालखी भुईंजला मुक्कामी असेल. त्यानंतर सारोळा, शिंदेवाडी आणि पुण्यात दोन दिवस मुक्काम करुन वारी 10 जून रोजी आळंदीत पोहचणार आहे.

शितोळे अंकली ते श्री क्षेत्र आळंदीपर्यंतच्या या पालखी सोहळ्याचं सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link