Ashadhi Ekadashi 2024: `विठ्ठल` शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही

Swapnil Ghangale Wed, 17 Jul 2024-8:10 am,

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांची गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. 

 

वारी, आषाढी एकादशी म्हटलं की आवर्जून तोंडी येणार शब्द म्हणजे विठ्ठल किंवा विठू माऊली!

 

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या या देवतेच्या विठ्ठल नावाचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नक्कीच या शब्दाचा अर्थ ठाऊक नसणार. 

 

विठ्ठल या नावाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिलेच्या सांगितले आहे, असं लेखक रा. चिं. ढेरे यांनी 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हटलं आहे.

 

या पुस्तकामध्ये विठ्ठल नामाचा अर्थ सांगण्यात आला असून विठ्ठल या शब्दाची तीन भागांमध्ये फोड होते.

 

विदा (ज्ञानेन), ठान् (अज्ञजनान्) लाति (गृहृाति) अशी विठ्ठल शब्दाची फोड करता येईल.

 

फोड करुन विठ्ठल शब्दाचा अर्थ, "अज्ञ जनाना जो ज्ञानाने स्वीकरतो, तो विठ्ठल!" असा होतो.

 

तर अनेक अभ्यासकांनी विष्णू- विष्टु- विठ्ठल अशा प्रक्रियेने विष्णुपासून विठ्ठल हे नाम बनले असं स्वीकारलं आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link