`मला कळत नाही की विकेट्सची गरज असताना रोहितने...`; WC Final नंतर माजी कर्णधाराला पडला प्रश्न

Swapnil Ghangale Tue, 21 Nov 2023-4:26 pm,

वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये भन्नाट कामगिरी केली. भारताने साखळी फेरीतील 9 आणि न्यूझीलंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामनाही अगदी दणक्यात जिंकला.

मात्र मैदानातील एक खराब दिवस भारतीय संघाला कधीही न विसरता येणाऱ्या कटू आठवणी देऊन गेला. भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामना 6 विकेट्स अन् 7 ओव्हर राखून जिंकला. भारतीय खेळाडू मान खाली घालूनच मैदानातून बाहेर पडले.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताच्या अनपेक्षित पराभवामुळे कर्णधार रोहित शर्मापासून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही अश्रू अनावर झाले. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज सलमान बटने ऑस्ट्रेलियन संघाचं कौतुक करताना रोहितच्या एका निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सलमान बटने आपल्या युट्यूब चॅनेलवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना, "फायलनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अगदीच वेगळा वाटला. त्यांनी भारतीय संघाला श्वासच घेऊ दिला नाही. त्यांची फिल्डींग प्लेसमेंटही भन्नाट होती," असं म्हटलं आहे.

"ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉलिंग करताना सातत्याने वेगात परिवर्तन केलं. त्यांना ठराविक अंतराने विकेट्स मिळत राहिल्या. बॉल जुना झाल्यानंतरही भारतीय फलंदाजांना फारश्या धावा करता आल्या नाहीत," असं सलमान बट म्हणाला.

टॉस हरल्याने भारताला पहिल्यांदाच धक्का बसल्याचंही सलमान बट म्हणाला. "भारताने उत्तम सुरुवात केली. रोहित शर्माने चांगली सुरुवात भारताला करुन दिली. मला वाटतं की त्याच्याकडून सर्वात मोठी चूक ही झाली की वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या सामन्यामध्ये तुम्ही एखादं ठराविक ध्येय निश्चित केलं पाहिजे. हा टप्पा ओलांडल्यानंतर तुम्ही वेगाने धावा करायला हव्यात," असं सलमान बट म्हणाला.

"ऑस्ट्रेलियाने भन्नाट गोलंदाजी केली. रोहित आणि विराट दोघेही बाद झालेत आणि सामन्यातील 25 ओव्हर शिल्लक आहेत अशी स्थिती भारताने या स्पर्धेत पाहिलीच नव्हती. रोहित शर्माने स्वत:ची विकेट ऑस्ट्रेलियाला भेट दिली. तर विराट कोहली कमनशिबी राहिला," असं सलमानने म्हटलं आहे.

विराट बाद झाल्यानंतर भारताला डाव सावरता आला नाही आणि सामन्यावरील ऑस्ट्रेलियाची पकड अधिक घट्ट झाली असं सलमान म्हणाला.

"ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असतानाच भारतीय फिरकी गोलंदाजांच्या वेळेस रोहित शर्माने स्लिपमध्ये फिल्डर का ठेवला नाही हे सुद्धा न समजण्यासारखं आहे," असंही सलमान बटने म्हटलं.

"सूर्यकुमार यादवने जबाबदारी खांद्यावर घ्यायला हवी होती. ते त्यानं केलं नाही. तो नेमकं काय करत होता हेच मला समजलं नाही. तळाच्या फलंदाजांबरोबर खेळताना आपण स्ट्राइक घेऊन जास्ती जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूर्यकुमार मोठे फटके मारण्याऐवजी एक धाव काढून नॉन स्ट्राइकर एण्डला जात होता," असं निरिक्षण सलमानने नोंदवलं.

 

ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान पहिल्यांदा 10-15 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांचा बॉल स्विंग होत होता. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. मात्र तीन विकेट्सहून अधिक विकेट त्यांना मिळाल्या नाहीत. दवं आल्यानंतर बॅटिंग अधिक सोपी झाली, असं सलमान म्हटला.

"सामान्यपणे रोहित हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याने फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत अशताना स्लिपमध्ये फिल्डर ठेवला नाही. 240 धावांच्या लक्ष्य असतानाच तुम्ही विकेट घेणं अपेक्षित आहे. मला कळत नाही की रोहितने स्पिप का ठेवली नाही? विकेट घेण्याचं सोडून हा सामना जिंकण्याचा इतर कोणताही मार्ग नव्हता," असं सलमान बट म्हणाला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link