बांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका

Tue, 06 Aug 2024-3:13 pm,

Bangladesh News : संपूर्ण जगभरात बांगलादेशची चर्चा सुरु असताना या देशात सत्तांतरानंतरचं चित्र नेमकं कसं असेल हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे. मोठ्या संख्येनं या शेजारी राष्ट्रातील जनसमुदाय रस्त्यांवर उतरून आंदोलनं करत असतानाच इथं भारतील एका कलाकाराचं नाव अचानकच चर्चेचा विषय ठरलं आहे. 

हे नाव म्हणजे अभिनेता चंकी पांडे याचं. सुयश पांडे असं खरं नाव असणाऱ्या या अभिनेत्यानं चंकी पांडे या खोट्या नावानं चित्रपटांमध्ये काम केलं. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये बऱ्याच वाईट दिवसांचा सामना केला. 

1987-1994 दरम्यान एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप जात असताना परिस्थिती इतकी वाईट वळणावर पोहोचली की पाहता पाहता चंकी पांडेची संपूर्ण चित्रपट कारकिर्द पणाला लागली. चंकी पांडेच्या आईवडिलांचा कलाविश्वाशी काहीही संबंध नव्हता. वैद्यकिय क्षेत्रात त्यांनी बरंच यश मिळवलं होतं. भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून चंकीच्या वडिलांची ओळख होती. तर त्याची आई डॉक्टर, फिजिशनल आणि डाएटिशिअन होती. 

 

 'आग ही आग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा चंकी अनेक चित्रपटांतून सहायक कलाकाराच्या भूमिकेत झळकला. पण, एक काळ असा आला की बॉलिवूडमधील एकाही निर्मात्या आणि दिग्दर्शकानं त्याच्याकडे पाहिलं नाही. अखेर चंकीनं 1995 मध्ये बांगलादेशी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि तिथं तो रातोरात सुपरस्टार झाला. 2003 पर्यंत त्यानं ही कलासृष्टी गाजवली. 

 

आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीदरम्य़ान चंकीनं बांगलादेशकडे आपला मोर्चा वळवण्यावर भाष्य केलं होतं. पडत्या काळात आपण बांगलादेशच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचं ठरवलं आणि तेथील जनतेनं आपल्याला अमाप प्रेम देत अडचणींवर मात करण्यासाठी बळ दिलं असं म्हणत चंकीनं कृतज्ञता व्यक्त केली. 

‘स्वामी केनो आसामी’, ‘बेश कोरेची प्रेम कोरेची’ अशा जवळपास 6 बांगलादेशी चित्रपटांमध्ये चंकी झळकला. स्थानिक भाषेवर प्रभुत्वं नसतानाही चंकीनं प्रचंड मेहनत घेत यश मिळवूनच भारत गाठला आणि स्वत:चं वेगळं अस्तित्वं निर्माण केलं. 

चंकीला बांगलादेशला अमिताभ बच्चन अशी नवी ओळख मिळाली. फॅशन डिझायनर भावना पांडे ही चंकी पांडेची पत्नी त्याच्या पडत्या काळात त्याचा आधार होऊन उभी होती. आपल्या जीवनातील हाच काळ पाहून चंकी कायम त्याची मुलगी, अभिनेत्री अनन्या पांडे हिला एकच शिकवण देतो, 'करिअरमध्ये काही चांगलं करण्याची इच्छा असेल तर आधी चाहत्यांचं प्रेम मिळवून त्यांचा आदर करायला शिका. अपयश पचवता येतं पण, यश हाताळणं सोपं नसतं'. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link