PHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर

Wed, 13 Dec 2023-9:59 pm,

आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याचे वडील हे एकेकाळी सुपरस्टार होते. त्याने आपल्या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनय असो त्याच्या लूकने तर तरुणी आजही घायाळ होतात. शिवाय त्याची डान्सिंग स्टाइल तर कमालीची आहे. 

 

नाही कळलं, आम्ही बोलत आहोत हृतिक रोशनबद्दल. आशा या जितेंद्रसोबतच्या चित्रपटातून त्याने बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 6 वर्षांचा असताना त्याने 100 रुपये मानधन घेतलं होतं. त्यानतंर आप के दिवाने, आस पास, आसरा प्यार दा आणि भगवान दादा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका हृतिकने केल्या होत्या. 

 

पण त्याला खरी ओळख मिळाली ती डिलांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट 2000 मध्ये 'कहो ना... प्यार है' यातून. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात 78.93 कोटी रुपये गल्ला केला होता. 

हिरो म्हणून त्याचा पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तरुणी तर त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. निळ्या डोळ्यांच्या या अभिनेत्याने तरुणींना प्रेमात पाडलं होतं. या चित्रपटानंतर त्याला 30,000 लग्नाचे प्रपोज आले होते. 

 

पण अभिनेत्याने त्याची मैत्रीण सुझैन खानशी लग्न करुन लाखो तरुणींचे हृदय तोडलं. या जोडप्याला दोन मुलं आहे. पण लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला. 

 

घटस्फोटानंतर सुझैन खानने अर्सलानशी नातं जोडलं. असो, पण 23 वर्षांच्या कारकिर्दीतअभिनेत्याने वॉर, क्रिश 3, क्रिश आणि धूम 2 सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 100 रुपये मानधनाने सुरुवात करणारा हा अभिनेता आता एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेतो.

सुझैन खानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक रोशन आता तो सबाला डेट करत आहे. तुम्हाला जाणून आश्वर्य वाटेल या दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक आहे. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link