माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ...; निवृत्तीच्या अफवांवर Mary Kom चं स्पष्टीकरण

Surabhi Jagdish Thu, 25 Jan 2024-11:18 am,

6 वेळा विश्वविजेती असलेली भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोम हिने निवृत्ती घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र यानंतर गुरुवारी आपण निवृत्ती घेतली नसल्याचं तिने स्पष्ट केलंय.

मेरी कोमच्या म्हणण्यानुसार, मी निवृत्ती जाहीर केलेली नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. ज्यावेळी मला निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा मी स्वतः सर्वांसमोर येऊन निवृत्ती जाहीर करेन.

काही मिडीया रिपोर्ट्ने मी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. मात्र त्यामध्ये तथ्य नाहीये, असंही मेरी कोमने म्हटलंय.

मेरी कोमने 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावलं होतं. 

इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सर्सना फक्त 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी आहे. मात्र आता मेरी कोमचं वय 41 झालं आहे.

मेरी कोम ही जगातील पहिली अशी महिला बॉक्सर आहे, जिने सहा वेळा विश्वविजेतं होण्याचा मान मिळवलाय.

2014 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी मेरी कोम ही भारतातील पहिली महिला आहे. तसंच 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावलं होतं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link