`मुंबईकरांनो पावसाळ्यात `या` ठिकाणांना नक्की भेट द्या

Sun, 26 May 2024-9:21 pm,

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे ट्राफिकच्या कोंडमाऱ्यापासून अलिप्त असलेलं निसर्गरम्य ठिकाण. आरे जंगल आणि संजयं गांधी राष्ट्रीय उद्यान ही दोन्ही ठिकाणं 

प्रदुषणाने विळखा घातलेल्या मुंबईचं हिरवंगार फुफ्फुस आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कान्हेरी लेणीकडे जाणारी पायवाट ही हिरवीगार झाडांनी व्यापलेली असून इथे बौद्ध स्तुप देखील आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रमण्यासाठी तुम्ही पावसाळ्यात कान्हेरी लेणीला भेट देऊ शकता. 

सिंहगडाला जसा पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे, अगंदी त्याचप्रमाणे त्याचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणारं आहे. पावसाळ्यात गड चढणं सहसा जोखमीचं असलं तरी सिंहगडचा आजूबाजूचा परिसर तुम्ही एका दिवासाच्या पिकनिकसाठी प्लॅन करू शकता.

पाऊस, हिरवाईने नटलेला सिंहगड, कांदा भजी, चहा आणि मक्याचं कणीस म्हणजे खऱ्या अर्थाने पावासाचा आनंद घेण्याची जागा आहे. 

जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल या ठिकाणाला नक्की भेट द्या. कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे निरनिराळ्या पक्ष्यांचं दर्शन होतं. त्याशिवाय पावसाळ्यात हा परिसर चितकाच खुलून दिसतो.

मुंबईला लागूनच असलेल्या पनवेल महामार्गापासून जवळ असलेल्या या किल्ल्याचा परिसर स्वर्गसुखाचा अनुभव देतो. 

 

मुलुंड कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यादरम्यान असलेला रस्ता तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव देतं. मुलुंड पीक ते सायप्रस हिल्सपर्यंतची पायवाट म्हणजे हिरव्या झाडांमध्ये लपलेला स्वर्ग.

 बारा ही महिने तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता मात्र खास पावसाळ्यात जंगल ट्रेल अनुभवायची असल्यास तुम्ही खास पावसात फिरण्यासाठी मुलुंडच्या या ठिकाणचा विचार करु शकता. 

हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानला जाणाऱ्या प्रत्येकाला तिथल्या छोट्या ट्रेनचं आकर्षण असतं. ट्रेनमधून  दिसणारा पाऊस आणि हिरवीगार झाडं अशी जंगलसफारी अनुभवायची असल्यास माथेरानला नक्की भेट द्या. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link