देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये 30 दिवसातील सर्वात मोठी वाढ

Sun, 28 Feb 2021-1:23 pm,

देशात कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. रविवारी गेल्या 30 दिवसांतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू देखील झाला. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजार 752 नवीन रुग्ण आढळले. तर 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 हजार 718 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या 24 तासात 7 लाख 95 हजार 723 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी, 29 जानेवारी रोजी कोरोनाचे 18,855 नवीन रुग्णांची वाढ झाली होती. नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय प्रकरणे वाढत आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत एकूण कोरोनाचे 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक कोटी 7 लाख 75 हजार 169 रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 051 वर गेली आहे. सक्रीय प्रकरण 1 लाख 64 हजार 511 आहे. 

आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 43 लाख 1 हजार 266 लोकांना लस देण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरण सुरू झाले. लसीकरणाचा दुसरा टप्पा उद्यापासून म्हणजे 1 मार्चपासून सुरू होईल. वृद्ध व्यक्ती (60 वर्षांपेक्षा जास्त) आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 51, केरळमध्ये 18 आणि पंजाबमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 52 हजार 092 लोकं मरण पावले आहेत. तामिळनाडूमध्ये 12 हजार 493 लोक, कर्नाटकात 12 हजार 326, दिल्लीत 10 हजार 909, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 266, उत्तर प्रदेशात 8725 आणि आंध्र प्रदेशात 7169 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link