PHOTO : बॉबी देओल 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्नाच्या वेळी धर्मेंद्र झाले विलन?

Sun, 10 Dec 2023-10:01 pm,

90 च्या दशकातील ती अभिनेत्रीही सुंदर आणि यशाच्या शिखरावर होती. बॉबी आणि तिचे सुत जुळलं. या दोघांचे अफेयर 5 वर्षे सुरु होते असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

 

बॉबी देओल आणि त्या अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र या नात्यातील विलन ठरले. धर्मेंद्र यांना या दोघांचे नातं मान्य नव्हतं म्हणून त्यांनी या नात्याला पूर्णविराम लावला. 

बॉबी देओल ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता ती अभिनेत्री होती नीलम कोठारी. नीलमने एका मुलाखतीत प्रेमाची कबुली दिली होती. 'होय, मी बॉबीसोबत खूप वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, आमचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

 

बॉबी देओल आणि नीलम यांचं नातं पूजा भट्टमुळे तुटलं अशी मीडियामध्ये चर्चा होती. त्यावरही नीलम यांनी सांगितलं की, ही अफवा असून हे पूर्णपणे चुकीचे आहे. आमचं नातं संपवण्यासाठी आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता. 

नीलम कोठारी आणि बॉबीने त्यांच्या 5 वर्षांच्या प्रेमाकडे पाठ फिरवली आणि वेगवेगळे मार्ग निवडले. नीलम आणि बॉबीच्या नात्याची चर्चा चित्रपटसृष्टीत कायम होते. 

नीलमशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉबीने 1996 मध्ये तान्याशी लग्न केलं. बॉबी आणि तान्याला एक मुलगा असून त्याचं नाव धर्मेंद्र यांच्या नावावर धरम देओल ठेवण्यात आलं आहे. 

 

हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या नीलम कोठारी यांनी 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. नीलम यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. बॉबीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नीलमने 2002 मध्ये ऋषी सेठियासोबत लग्न केलं. मात्र दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नीलम कोठारीने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनीशी लग्न केलं.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link