आमिर खानने घेतली सायरा बानोंची भेट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या `तो कठीण काळात...`

Wed, 03 Jan 2024-1:50 pm,

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानला हा सध्या त्याच्या लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. आमिर खानची लेक इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. 

लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत आमिर खानने नुकतंच दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. यावेळी तो, त्याची आई झिनत खान, पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि बहिण निखहत खान यांचे फोटो समोर आले आहेत.

सायरा बानो यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते आणि त्यांचे पती दिलीप कुमार आणि आमिर खानच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"कॅलेंडरप्रमाणे आयुष्य बदलत राहते. जसजशी वर्ष बदलतात आणि काळ पुढे सरकतो, त्यानुसार नवा प्रवास सुरु होतो. या सतत होणाऱ्या बदलांमध्ये एक सातत्य राहते."

"माझ्या आणि दिलीप साहेबांसाठी आमिर खान हा सातत्याने सोबत असलेल्या माणसांपैकी एक आहे. आमिर हा कठीण काळातही माझ्यासोबत होता."

"मला अजूनही आठवतंय की जेव्हा मी दिलीप साहेबांची बायोग्राफी 'द सब्सटेंस एंड द शॅडो' तयार करत होती, तेव्हा आमिरने मला शक्य तेवढी सर्व मदत केली." 

"आमिर हा असा माणूस आहे, जो मला त्याचे कौतुक करण्यास भाग पाडतो. तो सिनेसृष्टीच्या ग्लॅमरस आयुष्यापासून दूर आहे."

"मला काल आमिर, किरण, झिनत (आमिरची आई) यांना भेटून प्रचंड आनंद झाला. नव्या वर्षाची सुरुवात त्यांच्यासोबत गप्पा मारत आणि दिलीप साहेबांच्या आठवणींना उजाळा देत झाली. हा संपूर्ण अनुभव फार चांगला होता", असे सायरा बानो यांनी म्हटले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link