PHOTO: बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!

Diksha Patil Thu, 11 Jul 2024-5:05 pm,

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असायचे. 

रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन होतं. वयाच्या 84 व्या वर्षी जेमिनी गणेशन यांनी अखेरचा श्वास घेतला. 

रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी तीन वेळा लग्न केलं होतं आणि एका रिलेशनशिपमध्ये होते. 

जेमिनी यांच्या पहिल्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर वयाच्या 1940 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी अलामेलुशी केलं. त्यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलं होते. ते त्यांच्या पत्नीला 'बॉबजी' म्हणून हाक मारायचे.

त्यानंतर जेमिनी गणेशन हे सह-कलाकार पुष्पावली यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आले. जेमिनी आणि पुष्पावली यांना रेखा आणि राधा अशा दोन मुलींना जन्म दिला. मात्र, जेमिनी यांनी पुष्पावली यांच्याशी लग्न केलं नाही. 

जेमिनी यांनी विवाहीत आणि रिलेशनशिपमध्ये असतानाही दुसरं लग्न केलं. हे लग्न सह-कलाकार सावित्री यांच्याशी केलं. जेमिनी आणि सावित्री यांना एक मुलगी विजया आणि मुलगा सतीश कुमार होता. 

रेखा यांना वडील जेमिनी यांचा खूप राग यायचा कारण त्यांनी रेखा यांच्या आईशी लग्न केलं नाही. तर 1994 मध्ये रेखा यांनी वडिलांना त्यांच्या हातानं लाइफटाइम अवॉर्ड दिला.

जेमिनी गणेशन यांनी वयाच्या 78 व्या वर्षी 36 वर्षांच्या जुलियाना एन्ड्रुज लग्न केलं. मात्र, त्या दोघांना मुल-बाळ नव्हतं. रेखा यांच्या वडिलांच्या आयुष्यात एकूण चार महिला होत्या तर त्यांना 8 मुलं होती. त्यात एक मुलगा आणि सात मुली आहेत. (All Photo Credit : Vogue Arabia)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link