अभिनय ते आयपीएस अधिकारी; बॉलिवूडच्या `या` अभिनेत्रीला ओळखलं का ?

Wed, 17 Jul 2024-11:16 am,

अशीच एक अभिनेत्री जिने बॉलिवूडच्या काही सिनेमात काम केलं, मात्र काही दिवसांनी तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. 

 

अभिनेत्री सीमाला प्रसाद यांना लहानपणासून अभिनय आणि डान्सची आवड होती. सिमाला प्रसादने कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नाटकांमध्ये काम केलं होतं. 

 

मुळच्या भोपाळच्या असलेल्या सीमालाने बी.कॉम पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 

अभिनयाबरोबर सीमाला यांना समाजशास्त्र विषयात ही रस होता. त्यांनी  भोपाळमधील बरकतुल्लाह विश्वविद्यालयात समाजशास्त्रामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. 

सिमाला अभिनयासोबतच अभ्यासातही तितक्याच हुशार आहेत हे त्यांनी सिद्ध केलं. 

पीएससीच्या पहिल्याच अटेंप्टमध्ये त्या पास झाल्या. त्यानंतर सिमाला यांची डीएसपी म्हणून पोस्टींग झाली. त्यांनी कोणतेही कोचिंग क्लास  लावले नव्हते. स्वत: अभ्यास करुन  पुढे त्या यूपीएसी परिक्षा उत्तीर्ण झाल्या. 

अभ्यासू व्यक्तिमत्व असण्याबरोबरच सीमा रुपवान असल्यामुळं त्यांना सिनेमाच्या ऑफर देखील येत होत्या.

2017 मध्ये रिलीज झालेल्या 'अलिफ' या सिमेमात त्या झळकल्या होत्या. त्यानंतर, 2019मध्ये रिलीज झालेल्या  'नक्कश' या सिनेमात देखील काम केलं होतं.  

सिमाला म्हणतात की, जरी अभिनयाची आवड असली तरी माझ्या घरचं वातावरण हे मला आयपीएस होण्यासाठी पूरत होतं. त्याचा माझ्यावर चांगला परिणाम झाला. 

मला कधी वाटलं नव्हतं मी या गणवेशात स्वत:ला बघेल, त्यामुळे सुरक्षादलात काम करताना मला आनंद होत आहे. असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link